Share

शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; बंद दाराआड चर्चा

Published On: 

🕒 1 min read

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा एका मताने दारुन पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिंदे समर्थकांनी रोष व्यक्त करत थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच हल्ला केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामुळेच हा पराभव झाल्याची प्रतिक्रिया आ. शशिकांत शिंदे यांनी दिली होती. यावरुन साताऱ्यात (Satara) राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.

याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, (Shrinivas Patil) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

या चर्चेनंतर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी सातारा आणि जावळी या ठिकाणी लक्ष केंद्रीत करणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक एक हाती जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माझं सर्व कार्यकर्त्यांवर प्रेम असलं तरी पक्ष विरोधी कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. आपण सर्व माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!