Share

वक्फ जमिन प्रकरण; जिल्हा सत्र न्यायालयाकडून खा. इम्तियाज जलील यांची निर्दोष मुक्तता

Published On: 

औरंगाबाद : क्रांती चौक येथील सर्वे नं. ७७ मधील वक्फ जमीनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळविणाऱ्यांच्या ताब्यातुन वक्फ मालमत्ता सोडविण्याचा प्रयत्न करत असतांना खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतरांविरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच तार कंपाऊंड तोडल्या प्रकरणी क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे खा. इम्तियाझ जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संजय मुरलीधर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन दिनांक २०१६ मध्ये कलम १४१, १४३, १४७, १४९, ४२७ भादवी सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु असतांना सोमवारी न्यायधिक्ष पी.आर. शिंदे यांच्या खंडपीठाने न्यायनिवाडा देतांना सबळ पुराव्याअभावी खासदार इम्तियाज जलील, अरुण बोर्डे, अब्दुल रहिम नाईकवाडे, आरेफ हुसैनी, फिरोज खान, गंगाधर ढगे, अश्पाक कुरेशी व इतर यांची निर्दोष मुक्तता केली. क्रांती चौक येथील वक्फ जमीनीवर नामे हरप्रीतसिंग व्यक्तीने बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळकविल्याची तक्रार खासदार इम्तियाज जलील यांना त्यावेळी प्राप्त झाली होती.

त्या अनुषंगाने जलील यांनी संबंधित विभागास अतिक्रमण निष्कासित करुन वक्फ जमीन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला ताब्यात घेण्याची सुचना केली होती. परंतु सदरील प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने खासदार इम्तियाज जलील हे आमदार असतांना त्यांनी व एमआयएम पक्षाच्या नगरसेवक व इतरांनी घटनास्थळी जावुन सदरील मालमत्ता वक्फ मंडळाच्या ताब्यात दिली होती.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने नामे हरप्रीतसिंग व्यक्तीवर क्रांतीचौक येथील ज्युबली पान सेंटर शेजारील वक्फ जमीन बेकायदेशिररित्या अतिक्रमण करुन तार कंपाऊंड लावुन बळकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन मोक्यावरील सर्व सामान जप्त केले होते. जलील यांच्यातर्फे अ‍ॅड. आदिल बियाबानी यांनी काम पाहिले व त्यांना अ‍ॅड. शेख अल्तमश अब्दुल लतीफ यांनी सहकार्य केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!