औरंगाबाद : रेल्वेने प्रतिदिन तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. त्यातल्या त्यात दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेकांनी तिरुपती येथे दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला होता. परंतु पावसाने प्रवाशांच्या बेतावर पाणी फेरले आहे.
तिरुपतीला जाणाऱ्या रेल्वे देखील दिवाळी काळात फुल झाल्या होत्या. अनेकांना वेटिंग लिस्टमध्ये राहण्याची वेळ आली होती. परंतु अशा परिस्थितीत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचा परिणाम अनेकांना तिरुपतीला दर्शनासाठी जाता आले नाही. त्यामुळे प्रवाशी नाराज झाले आहेत. त्यातल्या त्यात रेल्वेवर देखील पावसाचा परिणाम झाला असल्याने काही रेल्वे रद्द तर काही अंशतः रद्द करण्याची वेळ आली आहे.
याशिवाय काही रेल्वे मार्ग बदलून धावत असल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. सोमवारी (दि.२२) नोव्हेंबरला पूर्णा येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७६०७ पूर्णां ते तिरुपती विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. आज मंगळवारी दि. २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी तिरुपती येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७६०८ तिरुपती ते पूर्णा हि विशेष गाडी रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड रेल्वे विभागाने स्पष्ट केले.
तिरुपती -श्री साई नगर शिर्डी – तिरुपती विशेष पूर्ववत धावणार
रद्द करण्यात आलेली तिरुपती-श्री साईनगर शिर्डी तिरुपती विशेष रेल्वे ही पूर्ववत धावणार असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. दि.२२ नोव्हेंबर रोजी गाडी क्रमांक १७४१७ दि. २३ आणि गाडी क्रमांक १७४१८ दि. २४ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आल्याचे कळविले होते. परंतु आता दक्षिण मध्य मुख्यालयाने कळविले आहे कि, या रद्द करण्यात आलेल्या गाड्या आज २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी पूर्ववत धावतील, परंतु मार्ग बदलून धावनार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फ्लाइटमध्ये देखील चष्मा..’म्हणत ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केली टिका
- सरकारचं ‘पॉवर सेंटर’ जिथे आहे तिथे मी आता उभा, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं वक्तव्य
- पती निकसोबत घटस्फोटच्या बातम्यासंदर्भात, प्रियांकांचा खुलासा
- ‘ही महाविकास आघाडी नसून ‘महाविनाश आघाडी’ आहे’
- चंद्रकांत पाटलांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांचा खोचक सल्ला; म्हणाले, आधी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

