Share

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार का ? सोमवारी मिळणार ठाकरी शैलीत उत्तर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता आहे,. येत्या सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लोकसभा जिंकल्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रमुख विरोधी पक्षांनी ईव्हिएम मशिनच्या विरोधात भूमिका घेतली असून राज ठाकरे यांनी देखिल या आंदोलनात उडी घेतली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली येथे मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेतली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखिल भेट घेवून ईव्हीएम विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे राज ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर हा मेळावा मात्वाचा असणार आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेकापसह अन्य पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत ईव्हीएम विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले असून त्याचे नेतृत्व राज ठाकरे आणि अन्य पक्षांचे नेते करणार आहेत. तेव्हा राज ठाकरे या मोर्चासंदर्भात महाराष्ट्र सैनिकांना काय आदेश देणार याकडे राज्ज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

आता ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ईव्हीएमचा वाद : मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा?

बंदूक आणि तोफगोळ्यांपेक्षा विकासाची ताकद मोठी – मोदी

मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून ही यात्रा काढली नाही – आदित्य ठाकरे

मनसे कॉंग्रेससोबत गेली तर उरले सुरलेले मतदारही दुरावतील : सुधीर मुनगंटीवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!