Share

सचिन वाझेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ ! ‘त्या’ मागण्या देखील न्यायालयाने फेटाळल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते. दरम्यान, या प्रकरणी सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. सबळ पुराव्यांनिशी त्यांना एनआयएने अटक केली होती.

आधी सचिन वाझे याची दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली होती. यानंतर, १४ मार्च रोजी रात्री उशिरा एनआयएने वाझेला अटक केली. यानंतर, एनआयए कोर्टाने त्यांना एनआयए कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर २३ एप्रिल पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याच काळात त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली होती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील त्यांनी खंडणीचा दबाव टाकल्याचा आरोप या पत्रातून केला होता. आता, वाझेच्या न्यायालयीन कोठडीत आगामी ५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी याला देखील ५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून एनआयएच्या विशेष न्यायालयात आज (२३ एप्रिल) रोजी सुनावणी घेण्यात आली आहे.

सचिन वाझेनी सुनावणी दरम्यान तीन मागण्यांसाठी अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी आपल्या वकिलामार्फत एक पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा असं म्हटलं होतं. मात्र, वाझे यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच, वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषध मिळावी यासाठीसुद्धा वाझे यांनी दुसरा अर्ज केला होता. मात्र औषधांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याने ते आधी जोडावे असा युक्तिवाद NIA च्या वकिलांनी केली आहे. दरम्यान, वाझेने दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळावे अशीसुद्धा न्यायालयाकडे विनंती केली होती. तो अर्जदेखील न्यायालयाने फेटाळला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!