🕒 1 min read
मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे. काजी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती.
अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर रियाजुद्दीन काझी एनआयएच्या रडारवर आले होते. सचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान,सुरुवातीला एनआयए कोर्टाने वाझे याला सुरुवातीला एनआयए कोठडी सुनावली होती. ही कोठडी नुकतीच संपली असून एनआयए कोर्टाने सचिन वाझेला आता न्यायालयीन कोठडीत पाठविले आले आहे. कोर्टाने त्यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाझेच्या वकिलांनी सुरुवातीला एनआयए कोठडीला विरोध केला होता.
दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाझेंच्या वकिलाने वाझेंसाठी कोर्टाकडे तुरुंगात सुरक्षित सेल देण्याची मागणी केली आहे. सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा सेल देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी केली असून वाझेची रवानगी आता तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- १०० कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुखांच्या २ स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स
- जालना; अवैध देशी दारूचे शंभर बॉक्स सहित दोन संशयित ताब्यात
- उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर फडणवीस काय करणार ?, राऊतांचा टोला
- ही’ कार बुक करण्यासाठी एसबीआय देत आहे बंपर ऑफर
- ‘रेमडेसिवीर भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय सुरू आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

