🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाचा महान फिरकीपटू हरभजन सिंगने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे गेमिंग आणि एस्पोर्ट्सवरील प्रेम उघड केले आहे. नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार्या हरभजनने सांगितले की बहुतेक भारतीय खेळाडूंना वेळ घालवण्यासाठी ऑनलाइन गेम खेळणे पसंत करतात. धोनी क्रिकेट पेक्षा गेम खेळणे पसंत करतो असा खुलासा त्याने केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत हरभजन सिंगने सांगितले “होय, भारतीय संघातील प्रत्येक क्रिकेटपटू इ स्पोर्ट्स खेळतो. मी देखील खेळलो आहे. आमचा माजी कर्णधार एमएस धोनी, तो जेवढे क्रिकेट खेळतो त्यापेक्षा १५ पट जास्त वेळ एस्पोर्ट्स खेळतो. सामन्यांनंतर, जर तुम्ही त्याला हॉटेलच्या खोलीत पाहिले तर तो इ स्पोर्ट्स खेळण्यात आपला वेळ घालवतो. कधी FIFA , कधी PUBG, कधी इतर खेळ.”
हरभजन सिंगने बरेच वर्ष भारतीय संघातून बाहेर राहिल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. तसेच महेंद्रसिंह धोनीनेही २०२० मध्ये क्रिकेटला अलविदा केले होते. हे दोघेही खेळाडू भारतीय संघात सोबत खेळले आहे. हरभजन भारतीय संघा बरोबरच आयपीएलमध्येही चेन्नई संघात धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपच ED चालवत असेल’; सुप्रिया सुळेंचा आरोप
- …आणि नितेश राणेंनी मानले किशोरी पेडणेकरांचे आभार
- “तो प्रतिभेमुळे संघात आहे” कोच द्रविडचा युवा क्रिकेटरला पाठींबा
- “मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचा…”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
- “२०२४ पर्यंत हे चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांचा तपास यंत्रणांना इशारा


