मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर पहाटे पासूनच ईडीने (ED) छापेमारी करायला सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवाब मलिक सत्य बोलत आहेत, म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उचलू आहे. तसेच भाजपवर (BJP) निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधात असलं की असल्या नोटीस येतात आणि सत्तेत गेल्यावर त्या नोटिसा विरघळून जातात, अशा शब्दात सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“तो प्रतिभेमुळे संघात आहे” कोच द्रविडचा युवा क्रिकेटरला पाठींबा
“मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचा…”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
“२०२४ पर्यंत हे चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांचा तपास यंत्रणांना इशारा
‘कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे’ – मेधा पाटकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

