🕒 1 min read
पुणे : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंलय.
यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
३. DMIC मध्ये १०००० एकर जमीन संपादित होऊनही उद्योग न येणे.
४. कचरा व्यवस्थापन
५. एके काळी सकाळ दुपार संध्याकाळ विमाने येत असताना विकासाची उलटी गंगा वाहून आता एकच विमान येणे. हे मुद्दे आहेत व अनेक वर्षे प्रलंबित आहेत.
निवडणूकी मध्ये भावनिक राजकारण लोकशाहीसाठी व जनतेसाठी घातक आहे.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 1, 2021
याच मुद्द्यावून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एकत्रित पणे सहा महिन्यांपूर्वी चिखलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर करून मोदी सरकारकडे मान्यते करिता पाठवला आहे. चंद्रकांत पाटील यांचे भाजपा चे सरकार तो मंजूर का करत नाही?औरंगाबाद शहरात विकासाचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. परंतु भावनेचे राजकारण करुन त्याकडे निवडणुकीत जाणिवपूर्वक दुर्लक्ष करवले जाते. ५ वर्ष भाजपाचे सरकार होते. नामकरण करायला कोणी रोखले होते?असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे; दगडूशेठ गणपतीला भाविकांचं साकडं
- ‘नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण…’ इरफान खानच्या मुलाची भावुक पोस्ट
- नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुरा कुस्तीच सुरु, फडणवीसांचा टोला
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- आज विद्या बालनचा ४२ वा जन्मदिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
