मुंबई : ऐन दिवाळ सणाच्या तोंडावर राज्यतील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी करत आझाद मैदनावर राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. तब्बल 4- साडे 4 तास चाललेल्या बैठकीतून राज्य सरकारने कोणताही मार्ग काढला नसल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. त्यावरुन हे आंदोलन अधिक तीव्र झालं आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील आंदोलन ठिकाणी जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची भेट घोतली. एसटीमध्ये ड्रायव्हर सीटवर बसून परिवहन मंत्र्यांना ‘अनिल परबांनी फक्त तासभर या सीटवर बसून दाखवावं’, असं खुलं आव्हान दिले आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सिंधुदूर्गमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकार जर एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न गांभीर्याने घेत नसेल तर केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश देऊन या प्रकरणी राज्यपालांना अधिकार द्यावेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना प्रकरणी जो मार्ग काढायचा आहे, त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी चर्चा करेल, असेही नारायण राणे यांनी म्हणाले आहेत. वेळ पडल्यास राज्याच्या परिवहन मंत्र्यांसोबतही चर्चा करेल, असेही नारायण राणे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा संप पंधरा दिवस सुरू आहे. जवळपास ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भयावह परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी आहे. असं असताना राज्य सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार आहे’, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य


