Share

‘औरंगाबाद मनपाने दिव्यांगांची हेळसांड त्वरित थांबवावी, अन्यथा मनसे छेडणार तीव्र आंदोलन’

Published On: 

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीत लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले असून यामध्ये दिव्यांग हि सुटलेले नाहीत. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद पालिकेत नोंदणीकृत दिव्यांगाचा निधी महानगरपालिका प्रशासनाने रोखून ठेवलेला आहे. दिव्यांगांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी असून येत्या आठ ते दहा दिवसात मनपाने दिव्यांगाना त्यांच्या हक्काचा निधी वितरीत करावा. अन्यथा मनसे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना देण्यात आला आहे.

औरंगाबादेत ३५०० दिव्यांगांनी महापालिकेकडे अधिकृत नोंदणी केली आहे. या दिव्यांगाना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ तसेच निधी देण्यात येत नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार महापालिकेकडे दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली आहे. महापालिकेने ८०० हून अधिक दिव्यांगाना या अगोदर निधी वितरीत केला असला तरी उर्वरित अनेक दिव्यांग या निधीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

अठरा कलमी कार्यक्रमानुसारही महानगरपालिकेने मदत निधी दिला नसल्याने दिव्यांगामध्ये महापलिका प्रशासानाविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मनपाने दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी एक समितीही गठीत केली असून या समितीत दिव्यांग प्रतिनिधींचा समावेश करावा अशीही मागणी या निवेदनाद्वारे मनसेने मनपा आयुक्तांकडे केली आहे.

मनपाने दिव्यांगांची हेळसांड सुरु केल्याचे मनसेच्या वारंवार निदर्शनास आले आहे. अनेकवेळा निवेदने, तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, अब्दुल रशीद, पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील, संदीप कुलकर्णी व नंदू गोटे यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!