Share

दुसरी लाट ओसरताच औरंगाबादेत लसीकरण केंद्रे पडली ओस

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा दुसऱ्या लाटेत लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक केंद्रावरील गर्दीत भांडणे देखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसरी लाट ओसरताच आता लसीकरण केंद्रे ओस पडताना दिसून येत आहेत. महापालिकेकडे सध्या २० हजार कोविशिल्ड लसी उपलब्ध आहेत मात्र ४५ वर्षावरील नागरिक लस घेण्यासाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे.

१६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. त्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये जेष्ठ नागरिक, ४५ प्लस नागरिकांना लस देण्यात आली. मात्र सुरुवातीला लसीबाबत जनजागृती नसल्याने लस घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य होते. मात्र जसजशी लसीबाबत जनजागृती होत गेली तसतशी नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मनपाने तर जम्बो लसीकरण मोहिमच हाती घेतली, १८ प्लस लसीकरणही १ मे पासून सुरू झाले होते. मात्र आता लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसात लसीकरणात अनेक अडचणी येत होत्या.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरातील ११५ वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. जम्बो लसीकरण मोहिम औरंगाबाद पालिकेने सुरू केली. सुरुवातीस महापालिकेला लसीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यामुळे एका दिवसात सरासरी दहा ते अकरा हजार जणांचे लसीकरण सुरू होते. लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या.

दरम्यान १ जून पासून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने लसीकरण सुरू केले व त्यानंतर केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर ८४ दिवसांनी वाढवले. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर पहिला तसेच दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोजी रोडावली आहे. ४५ वर्षांवरील सुमारे तीन लाख नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतलेली नाही. सध्या ८०० ते ९०० नागरिकांचे दररोज लसीकरण सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!