🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७५ वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.
काय टि्वट केलं होतं सचिन तेंडुलकरने
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.
हि भूमिका घेतल्यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गिल यांनी केले आहे.
Akshay Kumar's IQ is such that he asks PM if he eats mangoes… getting him to tweet shows govt is afraid. People who spoke against farmers don't have conscience. Sachin Tendulkar toed govt's line to get his son into IPL. He doesn't deserve Bharat Ratna: Congress MP Jasbir S Gill pic.twitter.com/QrvYrhIxcd
— ANI (@ANI) February 7, 2021
कॉंग्रेस खासदार जसबीर एस. गिल यांनी सचिनवर टीका केली आहे.शेतकऱ्यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी वक्तव्ये केली त्यांची सदसद्विवेकबुद्धी गमावली आहे.त्यांनी आत्मसन्मान गमावला आहे.सचिन तेंडूलकरने केवळ त्याच्या मुलाला आयपीएलमध्ये जागा मिळावी म्हणून सरकारने सांगितलेले ट्वीट केले.जनतेनेच आता विचार करावा कि हा व्यक्ती भारतरत्नच्या लायकीचा आहे का नाही.मला तर सचिन तेंडूलकर हा भारतरत्नसाठी लायकीचा व्यक्ती वाटत नाही.
भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे.
दरम्यान, खेळाडूला ‘ भारतरत्न ‘ मिळण्याची तरतूद नव्हतीच; परंतु, २०१०मध्ये कॉंग्रेस सरकार असताना या पुरस्काराच्या नियमांमध्ये बदल करून ‘ कोणत्याही क्षेत्रातील ‘ सर्वोच्च कामगिरी किंवा योगदानासाठी हा पुरस्कार देण्याचा निकष ठरवण्यात आला होता. त्यानंतर पुढे सचिनला ‘ भारतरत्न ‘ देण्यात आला होता.
ज्या कॉंग्रेसचे गिल प्रतिनिधत्व करत आहेत त्याच कॉंग्रेसच्या गांधी नेहरू घराण्यातील व्यक्तींना भारतरत्न देण्यावरून वाद सुरु आहे.दरम्यान,सचिनला भारतरत्न देखील कॉंग्रेसच्या काळात नियमांमध्ये बदल करून दिला आता त्यावेळी सरकारमध्ये असणाऱ्या राज्यकर्त्यांना सचिनला का भारतरत्न द्यावा लागला हा खरे तर स्वपक्षीय नेत्यांना प्रश्न विचारायला हवा होता. दरम्यान या वादावर कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
