🕒 1 min read
चेन्नई : उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यात रविवारी (०७ फेब्रुवारी) अतिशय भयावह घटना घडली. या जिल्ह्यातील रेणी गावातील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर (हिमकडा) कोसळले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चामोलीपासून ते हरिद्वारपर्यंतची कित्येक घरे वाहून गेली आहेत. प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
तर, ऋषीगंगा प्रोजेक्टचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.
आतापर्यंत रेणी गावातील १० लोकांचे मृतदेह सापडले आहेत. अजून कमीत कमी १००-१५० लोकांचा मृत्यू झाला असल्याची भीती आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटूंनी या शोकांतिकेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी ट्विटरद्वारे पीडित लोकांसाठी प्रार्थना केली आहे.
Prayers with the people of #Uttarakhand.
If you are stuck in any affected area and need any kind of help, please contact Disaster Operations Center number at 1070 or 9557444486.
— Virender Sehwag (@virendersehwag) February 7, 2021
Distressing news coming from #Uttarakhand about a glacier burst. Praying for everyone’s safety in the affected areas.
— Suresh Raina???????? (@ImRaina) February 7, 2021
Stay strong people of #Uttarakhand ???????? praying for everyone’s well being..
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- “पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
