Share

आई जेनेलियाच्या प्रश्नामुळे रियान गोंधळला, ‘तो’ मजेदार व्हिडीओ झाला व्हायरल

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून रितेश आणि जेनेलिया डिसोजा -देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. दोघे सोशल मीडियावर फोटो आणि विनोदी व्हिडीओ शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच जेनेलियाने तिच्या मुलासोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने ‘तू कोण आहेस?’ असा प्रश्न मुलाला विचारला.., या व्हिडिओवर मजेदार कमेंट ही येत आहे.

जेनेलियाने नुकतंच मोठा मुलगा रियानसोबत एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात जिनिलिया व्हिडीओच्या सुरुवातीला ‘हाय गाईज.. ही मी आहे आणि हा… तू कोण आहेस रे?’ असा प्रश्न विचारताना दिसते. हा प्रश्न ऐकून रियान दोन सेकंद गोंधळात पडतो. त्यावेळी त्याचे हावभाव फार सुंदर दिसतात. तर दुसरीकडे या व्हिडीओत जेनेलियाही फार सुंदर दिसत आहेत. यात तिचा नेहमी दिसणारा निरागस स्वभाव पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर फार मजेशीर कमेंट केल्या आहेत. रियानचे अॅक्शन देखील खूप भारी वाटत असल्याने स्टार किडसवर चाहत्यांनी लाईकचा वर्षाव करीत आहेत.

जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या माध्यमाने रितेशसोबत पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जेनेलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. पुढे जसजसे एकमेकांना त्यांचे स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. २०१२ मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि रेहाल अशी दोन मुले आहेत. जेनेलियाने बऱ्यादा यादोघांसोबत फोटो,व्हिडिओ शेअर करत असते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!