पुणे : मनसेच्या धडाडीच्या नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षाला रामराम ठोकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या रुपाली पाटील यांनी अचानक असा निर्णय का घेतला, याबाबत अनेक तर्क लढवले गेले. यानंतर मात्र त्यांनी यामागील कारण स्पष्ट केले.
मनसेचे हजारो कार्यकर्ते निष्ठेनं काम करत आहेत. त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे. गेली १४ वर्षे मी मनसेत काम करत होते. माझ्या राजीनाम्याचा धक्का जेवढा इतरांना बसला, तितकाच पक्षाच्या कार्यपद्धतीत झालेला बदल माझ्यासाठी धक्कादायक असल्याचे रूपाली पाटील यांनी म्हटले. मात्र यानंतर त्या कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता याबाबतही त्यांनी ट्वीट करत स्पष्ट संकेत दिले आहेत.
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …@NCPspeaks @ShivSena@INCIndia
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 16, 2021
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’दिसत नाहीत. हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार. असे ट्वीट करून त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ही वेळ काही लोकांमुळं आली आणि मी ती स्वीकारली आहे. काही महिला सर्व गोष्टी सहन करतात आणि काम करत राहतात. तर, काही संन्यास घेतात. माझ्या बाबतीत म्हणाल तर, मी परिस्थितीत बदल होण्याची वाट पाहिली. पण ते झालं नाही त्यामुळं मी माझा वेगळा निर्णय घेतला. १४ वर्षे हा छोटा काळ नव्हता. काळजावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी काल सांगितले. आणि आज त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणार असल्याचे संकेत त्यांनी ट्वीट करत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा आजपासून सुरू
- १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम- शरद पवार
- ‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका’
- आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळांची प्रतिक्रिया‘
- हा इतिहास संसदेत पाजळण्यापेक्षा मुंडे, राठोडांना सांगितला असता तर बरं झालं असते’


