Share

तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा आजपासून सुरू

Published On: 

🕒 1 min read

पुणे: आजपासून तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा (Pune Schools reopened) सुरू होणार आहेत. त्यामुळे दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा आजपासून वाजणार आहे. नवीन आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियन्टमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता शाळा खुल्या करण्यात येत आहेत.

दरम्यान शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना प्रतिबंधक संबंधी सर्व काळजी घेऊन शाळा सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याअगोदर सर्व वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील शाळाही आजपासून सुरू होणार.महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.

कालपासून (१५ डिसेंबर) मुंबईतील शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुण्यातील शाळा आता आजपासून सुरु होत आहेत. हळूहळू राज्यातील सर्व शाळा आता पुन्हा सुरु होत आहेत. यासाठी काही मार्गदर्शक सूचनादेखील राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करत पुन्हा शाळा सुरु करण्यात येत आहेत. दरम्यान शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना देण्यात यावे अशा मार्गदर्शक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!