पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीची मोट बांधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक, औरंगाबाद, पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंचा नाशिक, औरंगाबाद दौरा झाला आणि उद्या म्हणजेच बुधवारी पुणे दौरा नियोजित असतानाच पुण्यात येण्या आधीच मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या महिला नेत्या, मनसेच्या रणरागिनी रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील यांनी याबाबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्रामध्ये राज ठाकरेंनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानले आहेत. राज ठाकरे यांचे नाव कायम हृदयामध्ये राहिल, असेही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्याने मनसेला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
https://www.facebook.com/rupalipatilthombare/posts/6841935329180106
सप्रेम जय महाराष्ट्र, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहिल. यापुढेही आपले आशीर्वाद आणि मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल. जय महाराष्ट्र, असे म्हणत रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम केला आहे.
दरम्यान, रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र रुपाली पाटील यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अधिकृत भाष्य केले नाही किंवा कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. रुपाली पाटील या आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद विभागातून आज धावल्या ४० बसेस; कर्मचारी संपावर ठाम
- राहुल गांधींची गळाभेट घेत राऊत म्हणाले, ‘आप आये बहार आयी’
- घटस्फोटानंतर १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृताशी बांधली गाठ; जाणून घ्या कोण आहे ‘तो’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

