🕒 1 min read
पुणे : ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,’असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केल्याचं एका व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असं चित्र आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आक्रमक झाल्या असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
‘वादग्रस्त विधानाप्रकरणी १० दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ,’ असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला होता. मात्र तृप्ती देसाई यांनी इंदोरकीर यांच्याकडे माफी मागण्याचीच मागणी केली आहे.
आता यावर मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी इंदोरीकर महाराज यांना समर्थन देत तृप्ती देसाई यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘इंदुरीकर महाराज आपल्याला सुद्धा कायद्यानेच उत्तर द्यायचे अगदी जशास तसे. संपूर्ण महाराष्ट्रा तुमच्या सोबत होता,आहे आणि राहणार.श्रुपणखा वृत्तीला जनाची तर नाहीच, पण मनाची लाज नाही हो.’ अस म्हणत रुपाली ठोंबरे यांनी देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.
मा.इंदुरीकर महाराज आपल्याला सुद्धा कायद्यानेच उत्तर द्यायचे
अगदी जशास तसे .
संपूर्ण महाराष्ट्रा तुमच्या सोबत होता,आहे आणि राहणार.
श्रुपणखा वृत्तीला जनाची तर नाहीच, पण मनाची लाज नाही हो.. pic.twitter.com/7SjRg1jPNO— Rupali patil thombare (@Rupalispeak) March 1, 2020
त्यामुळे आता इंदोरीकर महाराज नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल. आता निवृत्ती महाराज इंदुरीकर तृप्ती देसाई यांच्या या नोटिशीला काय उत्तर देताय हे पाहणं महत्वाच आहे. त्यामुळे हा वाद अजून दूर जाणार अशीच चिन्ह आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

