मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) युगपुरुष, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, असे म्हंटले आहे.
यासंदर्भात रुपाली चाकणकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘युगपुरुष, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु – १) राजमाता जिजाऊ – शिवबांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता..२) राजपिता शहाजी राजे – शिवबांच्या मनात “स्वराज्य” ही संकल्पना रुजविणारे कर्तुत्ववान पिता..’, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1498156814491275264?s=20&t=lJesj-_zXwWdVqXQ4S-Q9Q
दरम्यान, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यासंदर्भात प्रशांत जगताप यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (२८ फेब्रुवारी २०२२) सकाळी १०.३० वाजता पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येईल.’
महत्वाच्या बातम्या :
- जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून झेलेन्स्की यांचे नाव इतिहासात कोरले जाईल- संजय राऊत
- छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही- सुप्रिया सुळे
- कुलदीप आणि सिराजने केली अंपायरची नक्कल ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- राज्यपालांच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंचे टीकास्त्र; म्हणाले,“हे लोकं सातत्याने महाराजांचा…”
- श्रीलंकेच्या मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचा सहकारी खेळाडूंना विशेष संदेश म्हणाला…


