Share

लाज वाटली पाहिजे तुम्हाला…तुम्हा भाजपा नेत्यांचा पोलीस बांधवांवर एवढा राग का आहे ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे – परवा दिवसभर MPSC परीक्षा हा मुद्दा माध्यमाच्या केंद्रस्थानी होता.ही परीक्षा रद्द केल्यानं काल राज्यभरात निदर्शने करण्यात आली. अमरावतीतही विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडून आणि विद्यार्थिनींना पुरुष पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबले.पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतल्याची घटना घडली.

अमरावती येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजप नेते अनिल बोंडे पोहोचले. या वेळी पोलीस आणि बोंडे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जची पोलिसांची कृती पाहून अनिल बोंडे संतप्त झाले. त्यानंतर पोलीस आणि बोंडेंमध्ये वाद झाला. बोंडे यांनी पोलिसांना ‘सरकारचे कुत्रे’ असे म्हणत हिणवले. त्यावर पोलिसांनीही ‘तुम्हीही कुत्रेच आहात,’ असे प्रत्युत्तर बोंडे यांना दिले..

आजपर्यंत शेकडो पोलिस दहशतवादी हल्ले,नक्षलवादी हल्ल्यांच्या वेळी कर्तव्य बजावताना, गुन्हेगारी व अपप्रवृत्तीशी सामना करतांना शहीद झाले आहेत. हेच पोलिस राज्यात कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी दिवसरात्र आपली ड्युटी बजावत असतात.हे सर्व ठावूक असूनही बोंडे यांनी पोलिसांचा अपमान केल्याचं समोर येताच त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी बोंडे आणि भाजपवर निशाणा साधला. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात,शेवटी संस्कार महत्वाचे असतात हे यातून दिसून येतं,ज्या पोलीस बांधवांना तुम्ही कुत्रे म्हणून त्यांच्या जबाबदारीचा , निष्ठेचा आणि वर्दीचा अपमान केला आहात तेच पोलीस बांधव तुम्ही मंत्री असताना तुमच्या रक्षणासाठी अहोरात्र पळाले असतील, लाज वाटली पाहिजे तुम्हाला.

आपल्यामध्ये एवढी मग्रुरी आहे की तुम्ही केलेल्या वक्तव्यावर तुम्हाला जरा ही पश्चाताप होत नसून तुम्ही निर्लज्जसारखं मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहात म्हणून सांगत आहात.तुम्हा भाजपा नेत्यांचा पोलीस बांधवांवर एवढा राग का आहे ?की दोन वर्षे झाली सत्ता जाऊन त्याचं अजूनही न गेलेलं फ्रस्ट्रेशन आहे का हे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांची देखील जीभ घसरली होती. शिंदखेडा तालुक्यातील एका गावात बोलताना “तालुक्यातील पोलीस म्हणजे जयकुमार रावळ यांनी ठेवलेल्या xxx पोरं आहेत,” असे आक्षेपार्ह विधान केले केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे सत्ताधारी गोटे यांनी केलेल्या विधानाबाबत मौन का बाळगून आहेत हे न उलघडणारे कोडे आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!