Share

‘कोणी शिल्लक राहिलं नाही, शिवस्वराज्य यात्रेला आता ‘शोध यात्रा’ म्हणावं’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

याच पक्षांतारावरून शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साठला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आगोदर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रमुखांनी मला जबाबदारी दिली. मी प्रवेश करुन पायवाट तयार केली. आता पायवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. पक्षांतर करायचय. पण कोण बाकी राहिलं आता, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आता शोध घेण्याची यात्रा आहे असं विधान केले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘सणांचे दिवस असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहता शिवसेनेला व्यापक रूप मिळत आहे. मंत्रिपद कशासाठी तर जनतेच्या हितासाठी आहे, गोरगरीब जनता हेच शिवसेनेचे कायम केंद्रबिंदू राहिले आहे. म्हणूनच बीड शहरात जनतेच्या आरोग्यासाठी ३०० खाटाच्या शासकीय रुग्णालय लवकर उभे राहणार आहे असं आश्वासन क्षीरसागर यांनी यावेळी दिले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून नेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात रश्मी बागल, दिलीप सोपल, वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील, यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!