मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी दौऱ्यादरम्यान नागपूरमधील पत्रकार परिषदेत पक्षाची ताकद वाढवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
ज्यांना कधी १० खासदार निवडून आणता आले नाही ते ३०० खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार? पवार साहेबांचं नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी १ प्रश्न मार्गी लावलेला दाखवा?, असं म्हणत नारायण राणे यांनी शरद पवार यांचावर टीका केली आहे.
दरम्यान, शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. ‘पक्षाची दिल्लीतील ताकद वाढविण्याबरोबरच जातीय शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षातून कोण व्यक्ती पर्याय बनू शकते हे महत्त्वाचे नाही, असं शरद पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
सद्या विरोधकांनी एकत्रितपणे येणे जास्त आवश्यक आहे. यादृष्टीने हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्षांशी चर्चा होईल, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. त्यांचा या भूमिकेवर राणे यांनी ट्विट करत टीकेची झोड उठवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दुसरा गाल पुढे करणं हे भीतीचं लक्षण नसून यासाठी…’, कंगनाच्या टीकेवर तुषार गांधींचे प्रत्युत्तर
- शेतकऱ्यांची औलाद आहे…दडपशाहीला भीक घालणार नाही; रविकांत तूपकर आंदोलनावर ठाम
- …त्यामुळेच वानखेडेंनी पहिल्या पत्नीच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अडकवले- नवाब मलिक
- नुसरत आणि निखिल यांचा विवाह भारतीय कायद्यानुसार अवैध ; न्यायालयाचा निर्णय
- राजकीय विचारसरणी ही ब्रिटीश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीप्रमाणे- शशी थरूर


