Share

‘कंगना हलकट बाई, तिने सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय’

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही, असं म्हणत कंगनाने अहिंसेची खिल्ली उडवली आहे. तिच्या या वक्तव्यावरुन रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी ती हलकट बाई असल्याचे म्हंटले आहे.

कृपाल तुमाने म्हणाले की, महात्मा गांधींबद्दल बोलण्याची तिची औकात नाही. अशा हलकट बाईबद्दल मला बोलायचं नाही,  सत्ताधारी नेत्याच्या मागे लागून त्यांचे पाय चाटून पुरस्कार मिळविला आहे. कंगनाला पद्मश्री पुरस्कार कसा मिळाला, हे सर्व खासदारांना माहीत आहे. त्यासाठी ती कुणाचे पाय चाटत होती, असे देखील तुमाने म्हणाले आहे.

कंगनाने महात्मा गांधी यांना सत्तेची भूक असल्याचे म्हटले होते. त्यावरून कृपाल तुमाने यांनी तिला सुनावले. ‘महात्मा गांधी यांना सत्तेची भूक असती तर ते कोणतेही महत्त्वाचे पद घेऊ शकत होते. महात्मा गांधीजी सत्तेचे लालची असते, तर त्यावेळी ते पंतप्रधान, राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते, असे मत कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!