पुणे : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून भिन्न विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, सर्वाधिक आमदार असून देखील विरोधी बाकावर असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. खासकरून विधिमंडळ अधिवेशनात कोरोना काळातील भ्रष्टाचार, मंत्र्यांवर होणारे आरोप, सरकारची कामगिरी यावरून भाजपने हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.
तर, कोरोना संकटाचं कारण देत गेल्यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारने अधिवेशन पूर्णकाळ न घेता ५-६ दिवसातच गुंडाळलं. आता येणारे पावसाळी अधिवेशन हे ५ जुलै पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन पूर्णकाळ घ्यावं अशी मागणी भाजपने केली आहे. तर, पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पूर्णकाळ अधिवेशन चालवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
‘राज्यापुढे राजकीय, सामाजिक तसेच शेती, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण याविषयिचे प्रश्न उभे राहिले आहेत. यावर सा़गोपांग चर्चा होण्याकरिता विधीमंडळाचं पूर्ण काळ अधिवेशन घेतलं जावं,’ अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे. ‘कोरोना संकटामुळे यापूर्वीचे जवळ जवळ सर्व अधिवेशन अल्पकाळ घेण्यात आले. मात्र, आता कोविड प्रतिबंधक लसीचा ठोस पर्याय आपल्यापुढे आहे. अशावेळी कोविडच्या कारणाने अधिवेशन अल्पकाळात उरकण्यात येऊ नये,’ असं देखील ते म्हणाले आहेत.
I am hopeful that most MLAs, officials & employees of the Maharashtra Vidhan Sabha have been vaccinated against #COVID. Strict protocols will doubly ensure that we will have a safe environment to conduct a full session and thus help restore balance in governance of the state
2/4— Siddharth Shirole (@SidShirole) June 20, 2021
यासोबतच, ‘माझ्या माहितीप्रमाणे केंद्रामध्ये 400 हून अधिक खासदारांचे लसीकरण झाले आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये जवळपासळ निम्मे आमदार आणि बहुसंख्य कर्मचारी वर्ग यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत. उरलेल्यांना पहिला डोस देण्यात यावा. हे काम फार आव्हानात्मक नाही. राज्य सरकारने तयारी दाखवली तर सहज शक्य आहे,’ असं देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी नमूद केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पोलिसांसाठी हेल्थ ॲप्लिकेशनसह विविध सुविधांचा यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
- मुंबईकरांना दिलासा ; कोरोना परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स ‘जैसे थे’
- सदाभाऊ खोत यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट ; केली ‘या’ विषयावर चर्चा
- सरनाईकांची भूमिका योग्यच ! उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करवी – रामदास आठवले
- देशात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण; मुंबई महापालिकेने आखला मेगा प्लान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

