Share

देशात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण; मुंबई महापालिकेने आखला मेगा प्लान

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. देशात उद्यापासून 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी मुंबईत लसीकरणाचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं आहे. फेरीवाले, रिक्षाचालक यांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा विचार करण्यात येत आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

आठवड्यातील तीन दिवस 100 टक्के वॉक-इन लसीकरण असणार आहे. लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर वॉक इन लस दिली जाणार आहे. या प्लानमध्ये मुंबई महानगरपालिकेने वॉक-इन लसीकरणासाठी आठवड्यातील तीन दिवस राखून ठेवलेले आहेत. तरुणांसाठी वेगवान लसीकरण मोहीम राबवली जावी, यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस वॉक-इन लसीकरणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या दिवशी 100 टक्के वॉक-इन लसीकरण केले जाणार आहे.

तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी काही टक्के रजिस्ट्रेशन तर काही टक्के वॉक-इन स्वरुपात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहीमेसाठी केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला 8 लाख 70 हजारांहून जास्त लसींचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे.

२१ जूनपासून कोरोना लसीकरण मोफत होणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जूनला घोषणा केली. लसीकरणाच्या या नव्या टप्प्यात १८ वर्षांवरील जास्त वय असलेल्या सर्व लोकांना निशुल्क लस दिली जाईल. याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!