🕒 1 min read
मुंबई : सोशल मीडीयावर अनेकदा सेलीब्रीटींना अफवांचा सामना करावा लागतो. कधी कधी तर कलाकारांना स्वत: समोर येत अफवा खोटी आहे असे सांगावे लागते. अशीच वेळ दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थच्या बाबतीत घडली आहे.
तामिळ अभिनेता सिद्धार्थ बाबत सध्या सोशल मीडीयावर एक अफवा पसरत आहे. चित्रपटसृष्टीत कमी वयात जगाचा निरोप घेतलेल्या कलाकारांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेता सिद्धार्थचे नाव घेण्यात आले आहे. या व्हिडिओमधील सिद्धार्थचा फोटो एका नेटकऱ्याने समाज माध्यमावर वायरल केला आणि येथूनच ही माहिती सिद्धार्थपर्यंत पोहचली. याबाबत आता स्वतः सिद्धार्थने स्पष्टीकरण देत ही अफवा असल्याचा खुलासा केला आहे.
https://twitter.com/Actor_Siddharth/status/1416662999629131778
युट्युबवर प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सौंदर्या आणि आरती अग्रवाल यांच्यासोबत सिद्धार्थचा फोटो दिसून येत आहे.अभिनेत्री सौंदर्याचा मृत्यू २००४ साली तर आरती अग्रवालचा मृत्यू २०१५ साली झाला आहे. सिद्धार्थने त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट करत याबाबत खुलासा केला आहे.त्याने युट्युबला याबाबत जबाब विचारला असता त्याला युट्युबने विचित्र उत्तर दिले आहे. या व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती चुकीची नसल्याचे युट्युबने स्पष्ट केले आहे. युट्युबच्या या उत्तराने सिद्धार्थ आणि त्याचे चाहते हैराण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे’ ; पदार्पणानंतर राहुल द्रविडकडून सूर्यकुमार आणि इशानचे अभिनंदन
- श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने नोदंवले अनेक ‘गब्बर’ विक्रम
- ‘केवळ नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार?’ ; दरेकरांचा सवाल
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- पृथ्वी शॉचं कौतुक करत शास्त्रींची घेतली फिरकी ; सेहवागचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
