🕒 1 min read
श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दमदार विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात भारताकडून इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन खेळाडूंनी पदार्पण केले. यात इशान किशनने ४२ चेंडुत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावांची आक्रमक खेळी केली. यासह सूर्यकुमार यादवनेही दमदार खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले.
या सामन्यापूर्वी आतंरराष्ट्रीय संघात पदार्पण झालेल्या सूर्यकुमार आणि ईशानचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून स्वागत करण्यात आले. त्यासह खेळाडूंना कॅप देत राहुल द्रविडने दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.
???? ????: That moment when @ishankishan51 & @surya_14kumar received their respective #TeamIndia ODI caps ???? ????#SLvIND pic.twitter.com/DjfSpSXjtG
— BCCI (@BCCI) July 18, 2021
यावेळी द्रविड म्हणाला, ‘या कुटुंबात ईशान आणि सूर्यकुमाचे स्वागत आहे तसेच आनंद देखील होत आहे. हे फळ या खेळाडूंच्या मेहनतीचे आहे. यावेळचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
- श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने नोदंवले अनेक ‘गब्बर’ विक्रम
- ‘केवळ नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार?’ ; दरेकरांचा सवाल
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- पृथ्वी शॉचं कौतुक करत शास्त्रींची घेतली फिरकी ; सेहवागचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
