Share

रात्रीत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा, अनेक नेत्यांनी वाहिल्या श्रद्धांजली

Published On: 

नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचे ट्विट केले होते. मात्र ही अफवा असल्याचे समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केले आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, या प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे. खातरजमा करण्याअगोदर माझ्या निधनाची बातमी देण्याची कसली घाई होती असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

सर्वप्रथम शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन याना श्रद्धांजली वाहिली. परंतु नंतर एका युजरने त्यांना याबाबद सत्यता सांगितल्यानंतर त्यांनी लगेच ते ट्विट डिलीट केलं. परंतु तोपर्यंत इकडे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पण हे वृत्त खोट असल्याचं समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ट्विट काढून टाकले.

एवढेच नव्हे तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील घाईगडबडीत सुमित्रा महाजन यांना श्रद्धांजली वाहिली. सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत सुमित्रा महाजन यांना श्रद्धांजली वाहिली आणि काही वेळेतच ती पोस्ट डिलीट केली. त्यामुळे राजकीय नेत्याचं नक्की चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत सुमित्रा महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, ‘न्यूज चॅनेल्स कसं काय अशी बातमी देऊ शकतात, माझ्या निधनाची बातमी देण्याआधी किमान इंदौरच्या प्रशासनाकडे चौकशी तरी करून घ्यायची. माझ्या भाचीने याबाबत थरूर यांना ट्विटरवर ही अफवा असल्याचं सांगितलं. पण खात्री करण्याआधीच असं ट्विट करण्याची काय घाई होती?’ असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी विचारला आहे.

शशी थरुर यांच्या ट्विटवर भाजपचे राष्ट्रीय सचिव कैलास विजयवर्गीय यांनीही उत्तर देत म्हटलं की, सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत आहे. देव त्यांना दीर्घायुष्य देवो. त्यानंतर थरुर यांनी सुमित्रा महाजन यांच्या निधनाबद्दल केलेलं ट्विट डिलिट केलं. सुमित्रा महाजन यांना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!