मुंबई: परप्रांतीयांना राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सरकारने अट घातली आहे. राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर चाचणी दाखवणे बंधनकारक असणार आहे. कोरोना संक्रमणाचा प्रभाव अजूनही कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही अट घातलेली आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या अजूनही वाढतच आहे. कालच गेल्या २४ तासांत देशात ४० हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर राज्यातही रोज नवनवीन कोरोना रुग्णांची भर पडतच आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत ४ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना आटोक्यात येत नाही तोच राज्यात आता डेल्टा प्लसचे रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्ष्यात घेत शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच ज्या लोकांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे शक्य नाही. अशा लोकांना आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवाणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान राज्यात दिवसभरात ६,६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ६१,८०, ८७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- परदेशी भूमीवर रिषभचा चमत्कार ; कमी वेळातच तोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम
- ट्रक चोरी प्रकरणी आरोपींना दोनदिवसांची पोलीस कोठडी
- आता जाहीर सभांमधून शरद पवारांचे व्हिडीओ लागणार बहुधा – अतुल भातखळकर
- औरंगाबादेत शिवसेना, भाजप, काँग्रेस मनपा निवडणूकीच्या तयारीत व्यस्त; तर ‘राष्ट्रवादी’ अजूनही सुस्तच!
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

