Share

आता जाहीर सभांमधून शरद पवारांचे व्हिडीओ लागणार बहुधा – अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्दा गाजत आहे. जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे ‘जातीचा मुद्दा त्या त्या जातीतील नेत्यांना मोठं करण्यासाठी पुढे केला जातो. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या विधानानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी २०१९ मधील ‘लाव रे तो व्हिडीओ’ ची आठवण करून देत आता शरद पवार यांचे व्हिडीओ लागतील असा उपरोधिक टोला लगावला आहे. ‘आता जाहीर सभांमधून शरद पवारांचे व्हिडीओ लागणार बहुधा,’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकांआधी प्रचार सभेतून लाव रे तो व्हिडीओ मोहित करून राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या पॅटर्नची चांगलीच चर्चा झाली होती.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

‘महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे वातावरण तयार केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरोप करणारा जेम्स लेन कोण आहे? ज्याने ते पुस्तक लिहिलं. आता तो कुठे आहे. कोणी ओळखतं का त्याला हे सारे ठरवून केलेले होते. एखाद्या विशिष्ट जातीच्या व्यक्तींनी शिवाजी महाराज यांच्याबाबत जेम्स लेनला चुकीची माहिती दिल्याचा प्रचार केला गेला. राजकीय स्वार्थासाठी काहींनी असे वातावरण निर्माण केले असा आरोप राज ठाकरे यांनी मुलाखतीत केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!