Share

ट्रक चोरी प्रकरणी आरोपींना दोनदिवसांची पोलीस कोठडी

Published On: 

औरंगाबाद : रस्‍त्‍यावर उभा केलेला ट्रक चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिसांनी गुरुवारी दि.१२ रात्री आणखी पाच जणांना अटक केली. आरोपींना रविवारपर्यंत दि.१५ पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शुक्रवारी दि.१३ दिले.

रॉबर्ट विजय नाडे (२२, रा. लाईननगर वाळुज), काकासाहेब शांतवन पवार (३०, रा. शिवराई वाळुज), अमोल सुनिल कसाब (२१), शुभम महादेव खोत (२२, रा. दोघे रा. म्हाडा कॉलनी, देवळाई परिसर) आणि करण गणपत सिरसाठ (२०, रा. समता कॉलनी, वाळुज) अशी आरोपींची नावे आहेत.

रामनाथ प्रभाकर उडाण (४६, रा. आयोध्‍यानगर, बजाजनगर) यांनी हायवा ट्रक चोरी प्रकरणी दिलेल्या फिर्यादवरुन एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यता आला. गुन्‍ह्यात यापूर्वी पोलिसांनी धुळे येथून कुलदिप सिंग रंधावा आणि आफताफ खान या दोघांना अटक केली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन ट्रक चोरी करुन ती धुळे येथे नेणार्या वरील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील सयद शहनाज यांनी आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत. तसेच गुन्‍ह्यात आरोपींनी वापरलेले सीम कार्ड जप्‍त करायचे असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!