Share

आरटीओंची धडक मोहीम; खासगी बसेसवर केली कारवाई

Published On: 

जालना: कोरोना संसर्ग ओसरत आला तसेच सार्वजनिक तसेच खाजगी वाहतुक व्यवस्था पुर्वपदावर येत आहे. पण कोरोना चे नियम पाळताना अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे असे नागरीकांचे म्हणणे होते. आवैध वाहतुकीच्या माध्यमातुन अनेक खाजगी वाहतुकदार हे अव्वाच्या सव्वा पैसे उकळत होते. यावर लगाम बसण्यासाठी आरटीओ कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. आणि खाजगी बसेसवर कारवाई सुरू केली.

विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनाचा कर नसने, रिफ्लेकटर, इंडिकेटर, टेल लाइट, वायफर नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे व जादा भाडे आकारणे आदी बाबींची तपासणी आरटीओ कडुन करण्यात येत आहे. दरम्यान, ४७ वाहनांपैकी २ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण बसविण्यासाठी या कारवाया केल्या जात आहेत. दरम्यान, आरटीओ कार्यालयाकडून खासगी बसमधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४७ बसेसवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ३ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!