Share

नांदेड जिल्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचे आत्मदहन

Published On: 

नांदेड: वनविभागात झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी होत नसल्याने दडपणात येऊन माहिती अधिकाऱ्याने आत्मदहन केले. वनविभागाच्या जमिनीवर ग्रामपंचायतीकडून रोजगार हमीची बेकायदेशीर कामे करुन बिले उचलल्या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तसेच दहा मोर व हरणांची हत्येची चौकशी केली गेली नाही, म्हणून परिसरातील चोंडी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे यांनी वन विभागाच्या माती नाला बंधाऱ्यात स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन केले. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.

गावालगत वन विभागाची सर्वे नं.६४, १३२, १३३ राखीव जमीन असून ६ वर्षांपूर्वी या जमिनीवर ग्रामपंचायतीकडून रोजगार हमीची ९ माती नाला बंधाऱ्याची कामे झाली. त्याची बिले उचलण्यात आली. हे काम करताना ४ हरीण व १० मोरांची हत्या झाल्याची तक्रार करुन चौकशीची मागणी ढवळे यांनी वन विभागाकडे केली होती. मात्र वनविभागाकडून याबाबत कसलीही चौकशी होत नसल्याने शेवटी त्यांनी १६ मार्चला एका निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावेळी त्यांनी १६ एप्रिलचे आत्मदहन स्थगित करीत असून २८ एप्रिलपर्यंत याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी; अन्यथा २८ एप्रिलला वन विभागाच्या जमिनीत झालेल्या माती नाला बंधाऱ्यात आत्मदहन करु, असा इशारा दिला होता.

यानंतर २८ एप्रिल रोजी पहाटे चोंडीतील वन जमिनीवरच ढवळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्मदहन केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यावर अनेक जण गोळा झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपाधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, सपोनि माणिक डोके हजर झाले. मात्र दिवसभर त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन रोखून धरण्यात आले. अखेर सायंकाळी पोलिसांनी मयताचा मुलगा जनार्दन ढवळे यांच्या फिर्यादीवरुन माळाकोळी पोलीस ठाण्यात तत्कालिन सरपंच सुदामतीबाई गिते, देविदास जळबा गिते, ज्ञानेश्वर गिते, सदाशिव गिते, गोविंद गिते, सटवा सांगळेविरुध्द कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतरच मयताचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!