Share

नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली चोवीस तासात ७६९ रुग्ण बाधित; १२३४ जणांना सुटी

Published On: 

नांदेड: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा कहर काही अंशी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या ३६६२ अहवालापैकी केवळ ७६९ अहवाल कोरोना बाधीत आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६१७ तर अँटिजेन तपासणीद्वारे १५२ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात एकुण बाधीतांची संख्या ७८ हजार ७०१ एवढी झाली असून यातील ६५ हजार ०१४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला ११ हजार ९१७ रुग्ण उपचार घेत असून १९२ बाधीतांची प्रकृती अतिगंभीर आहे.

२६ ते २८ एप्रिल दरम्यान २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १५०७ झाली आहे.दि. २६ एप्रिल रोजी अश्विनी रुग्णालय नांदेड येथे बिलोलीतयेथील ५९ वर्षाचा पुरुष, २७ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे पावडेवाडी नांदेड येथील ६० वर्षाचा पुरुष, कंधार येथील ८१ वर्षाचा पुरुष, नायगाव येथील ६० वर्षाची महिला, कुष्णूर तालुका नायगाव येथील ५५ वर्षाचा पुरुष, चांभरा तालुका हदगाव येथील ५५ वर्षाचा पुरुष, कंधार येथील ५० वर्षाचा पुरुष, हदगाव येथील ८८ वर्षाचा पुरुष, नायगाव येथील २६ वर्षाची महिलेचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नवीन मोंढा नांदेड येथील ७२ वर्षाचा पुरुष, चिकाळा तालुका मुदखेड येथील ६५ वर्षाचा पुरुष, भोकर येथील ४० वर्षाचा पुरुष, खडकपुरा नांदेड येथील ६० वर्षाची महिला, गाडीपुरा नांदेड येथील ६० वर्षाचा पुरुष, बारसगाव तालुका अर्धापूर येथील ६० वर्षाचा पुरुष, नारायण रुग्णालय येथे कहाळा तालुका नायगाव येथील ७० वर्षाची महिला, स्वामी विवेकानंद रुग्णालय नांदेड येथे बंजरंग कॉलनी नांदेड येथील ५१ वर्षाचा पुरुष दुर्दैवी निधन झाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!