Share

रॉयल एनफिल्ड ची नवीन बाईक लवकरच भारतात लाँच होणार

Published On: 

नवी दिल्लीः तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात.गेल्या काही दिवसांत रॉयल एनफिल्ड ची बहुचर्चित रॉयल एनफिल्ड मेन्टोर 350 या मोटरसायकलला भारतात लाँच करण्यात आली होती.

त्यांनतर आता कंपनी लवकरच भारतात पाच नव्या बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक बाईक लाँचिंगसाठी पूर्णपणे सज्ज असून थोड्याच दिवसात ही बाईक लाँच केली जाऊ शकते. ‘हंटर 350’ ही बाईक बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. नुकीतच टेस्टिंगदरम्यान ही बाईक पाहायला मिळाली आहे.

‘हंटर 350’ या बाईकच्या लाँचिंगबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु टेस्टिंगदरम्यान जेव्हा ही बाईक पाहायला मिळाली त्यावरुन असं कळतंय की, या बाईकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अॅनालॉग स्पीडोमीटर आणि LCD देण्यात आली आहे. यावर बाईकचं स्पीड, टाईम इत्यादी माहिती पाहायला मिळेल. परंतु कंपनीने या बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉड दिलेलं नाही. असं म्हटलं जातंय की, हे फीचर नव्या बाईकमध्ये दिलं जाणार नाही.

या नव्या बाईकचं डिझाईन सध्याच्या मेन्टोर 350 या बाईक सारख असल्याच सांगण्यात येत आहे. . तसेच या बाईकचा रॉयल एनफिल्ड च्या एंट्री लेव्हल पोर्टफोलियोमध्ये समावेश केला जाईल. याचाच अर्थ या बाईकची किंमत कमी असेल. या बाईकमध्ये कंपनीने रेट्रो स्टाईल राऊंड शेप हेडलाईट, वोलोमाइन फ्युल टँक, सिंगल पीस सीट, स्प्लीट ग्रॅब रेलचा समावेश करण्यात आला आहे. तर या बाईकच्या इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 349cc क्षमते सिंगल सिलिंडरयुक्त इंजिन मिळेल. हे इंजिन 20 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स मिळेल. कंपनी या बाईकच्या फ्युल टँकच्या डिझाईनमध्ये बदल करु शकते. तसेच एका वेगळ्या पेंट स्कीमसह ही बाईक बाजारात लाँच केली जाऊ शकते. ही बाईक कंपनीच्या नवीन J प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, असं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!