Share

विदर्भाच्या ‘संजय’ च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  पूजा चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणामध्ये राजीनामा द्यावे लागलेले विदर्भातील वनमंत्री संजय राठोड यांच्या जागेवर आता मराठवाड्यातील संजय शिरसाठ यांची वर्णी लागते का? याबाबत उत्सूकता आहे. २०१९ च्या मंत्रीमंडळ निवडतांना मराठवाड्यामधून मोठ्या ताकदीने मंत्री पदासाठी आलेले नाव म्हणजे आमदार संजय शिरसाठ हे होते. मात्र, त्यांना त्यावेळी संधी नाकारण्यात आली होती.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ हे तिसऱ्यांदा २०१९ च्या निवडणुकीत निवडून आले. महाविकास आघाडी स्थापन होऊन शिवसेनेने औरंगाबाद जिल्ह्याला दोन मंत्रीपद दिले. त्यातील सिल्लोड – सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार आणि पैठणचे आमदार संदीपान भूमरे यांचा समावेश होता. त्यातील सत्तार हे आयाराम आहेत. तसेच हे दोन्ही चेहरे ग्रामीण विभागातील आहेत. मात्र, निष्ठावंत आणि शहरी चेहरा असलेले शिरसाठ यांच्या रुपाने आणखीन एक मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा औरंगाबादकरांना आहे.

मराठवाड्यामध्ये तसेच औरंगाबादेत शिवसेनेची मोठी ताकद आहे. तर आता औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाठ यांना जर मंत्रीपद दिले गेले तर महानगर पालिका निवडणूकीसाठी खुप मोठा फायदा मिळू शकतो. हे देखील शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठी तसेच शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच माहित आहे. येणाऱ्या काही महिन्यात निवडणुका जर लागल्या तर औरंगाबाद शहरामध्ये एक विशेष असा फायदा शिरसाठ यांच्या माध्यमातून पुन्हा नवीन ताकद मिळेल.

जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद 
औरंगाबाद जिल्हातील ९ विधानसभा मतदार संघापैकी एकट्या शिवसेनेचे ६ आमदार निवडून आलेले आहेत. यातील शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी २ आमदार हे शिवसेनेचे आहेत. तसेच शहरात २५ वर्षांपासून महानगर पालिकेवर भाजप – सेना युतीच्या माध्यमातून शिवसेनेचे महापौर होते. शहरासह ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची खुप मोठी ताकद आहे. तर आता शहराला गरजेचे आणि महत्वाचे असणारे मंत्रीपद शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या सत्तेमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादला झुकते माप देणार का ? याकडे औरंगाबादसह मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!