औरंगाबाद : राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल वाढीबाबत पंपावरील बॅनरखाली निषेध म्हणून रविवारी चूल मांडत आंदोलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देशात पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारबद्दल देशातील सामान्य नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महिन्याभरात किमान १० वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. फेब्रुवारीत तीनदा गॅस दरवाढ झाल्याने गृहीनींना घराचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडले आहे. ८ दिवसांमध्ये तररोज किंमती वाढतच आहेत. याचा निषेध म्हणून रविवारी राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे शहरातील पेट्रोल पंपावर मोदींच्या बॅनरखाली चूल मांडत आंदोलन करण्यात आले.
काही दिवसापासून दररोज पेट्रोल डिझेल सोबत गॅस दरवाढ होत आहे. याबाबत सरकारने किंमती कमी करण्यासाठी पावले उचलण्याऐवजी सरकारमधील मंत्री काहीतरी बडबडत आहेत. दरम्यान पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यामुळे दरवाढ झाल्याचा अनोखा दावा केल्याने महिलांमध्ये आणखी संतापात भर पडली. तर गॅस दरवाढीचा विरोध करण्यासाठी व झालेली दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महीला आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात चूल मांडून आंदोलन करत निषेध करण्यात आला.
शहरात सध्या गॅसचे सिलेंडर ८०३ रुपयांना घ्यावा लागत आहे. हे दर सामान्यांना परवडणारे नाही. बीड बायपास रोडवरील सावित्री लॉन्स, म्हस्के पेट्रोलपंपावर गॅस दरवाढीविरोधात सोशल डिस्टन्सचे पालन करत राष्ट्रवादी महिला आघाडीने प्रतिकात्मक चूल मांडो आंदोलन केले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छाया जंगले, शहराध्यक्ष मेहराज पटेल, राष्ट्रीय सचिव विना खरे, सलमा बानो, वैशाली पाटील, शकीला खान, संध्या सिरसाठ, विद्या मोरे, वैशाली चौधरी, स्मिता तुपे, शालिनी नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
