Share

‘हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’ ; एल्गार परीषेदेत शरजिल उस्मानी याच वादग्रस्त विधान

Published On: 

पुणे : “आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे”, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं आहे. शरजील उस्मानीच्या या वक्तव्यानं वादंग निर्माण झाला आहे.

पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शरजील उस्मानीने म्हटलं की, “हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात १९ लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लीम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करून हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीने हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत,” यावरून आता वाद निर्माण होत आहे. या वक्तव्यामुळं भाजपनं जोरदार टीकेला सुरुवात केलीय. असं वक्तव्य करण्याची हिंमत होतेच कशी, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलाय.

२०१७ मध्ये पुण्यातील शनिवारवाडा इथं एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा इथं हिंसाचार उसळला होता. त्याचा थेट संबंध पुण्यातील एल्गार परिषदेशी जोडण्यात आला. त्यामुळे या परिषदेत सहभागी अनेक मोठ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही लोक आजही कारागृहात आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!