Share

Rohit Pawar | “सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते हा प्रकल्प राज्यातून जाण्याला सध्याच सरकार जबाबदार आहे. तर सत्ताधारी पक्षनेते महाविकास आघाडी सरकार या सगळ्याला जबाबदार असल्याचे आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते आणि कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा वेदांता प्रकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

महाविकास आघाडी सरकार सवलती देण्यात कमी पडलं नाही. तर सध्याचं महाराष्ट्रातील राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरू एक ट्विट केलं आहे.

त्यामध्ये पुढे रोहित पवार यांनी म्हटलं की, एकीकडं सेमीकंडक्टर उद्योगाला चालना मिळत असल्याचा आनंद आहे पण दुसरीकडं वेदांत महाराष्ट्रातून गेल्याचं दुःख आहे. महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या सवलती गुजरातपेक्षा 11 हजार कोटींनी जास्त होत्या तरीही वेदांत गुजरातला का गेला ?, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला होता.

दरम्यान, रोहित पवार यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला सत्ताधारी पक्षनेते काय प्रत्तुत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!