🕒 1 min read
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते हा प्रकल्प राज्यातून जाण्याला सध्याच सरकार जबाबदार आहे. तर सत्ताधारी पक्षनेते महाविकास आघाडी सरकार या सगळ्याला जबाबदार असल्याचे आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते आणि कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा वेदांता प्रकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
महाविकास आघाडी सरकार सवलती देण्यात कमी पडलं नाही. तर सध्याचं महाराष्ट्रातील राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरू एक ट्विट केलं आहे.
त्यामध्ये पुढे रोहित पवार यांनी म्हटलं की, एकीकडं सेमीकंडक्टर उद्योगाला चालना मिळत असल्याचा आनंद आहे पण दुसरीकडं वेदांत महाराष्ट्रातून गेल्याचं दुःख आहे. महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या सवलती गुजरातपेक्षा 11 हजार कोटींनी जास्त होत्या तरीही वेदांत गुजरातला का गेला ?, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला होता.
दरम्यान, रोहित पवार यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला सत्ताधारी पक्षनेते काय प्रत्तुत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | लवंगाचे तेल दूर करते अनेक आरोग्याच्या समस्या,जाणून घ्या!
- MNS । “गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने…; राज ठाकरे आक्रमक
- MNS | “मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील”
- Instagram Down | जगभरात इंस्टाग्राम डाऊन, ट्विटरवर आला मीम्सचा महापूर
- Shivsena : शिवाजी पार्कबाबत आज हायकोर्टात युक्तिवाद, शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा? आज निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
