Share

Kishore Patil : शिवसेनेसारखी भाजपाची परिस्थिती होऊ नये यासाठी किरीट सोमय्यांना समज द्यावी – किशोर पाटील

Published On: 

Kishore Patil । मुंबई : आज शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलाय. गुवाहाटीचा प्रवास हा आख्या भारताला समजला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन करत गाडी बसलो आणि सुखरूप मुंबईला पोहचलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पहिजेच हा चंग बांधूंन आम्ही गेलो होतो. तो चंग आम्ही पूर्ण केला. आम्ही आमच्या आयुष्याचे ४० वर्ष शिवसेनेसाठी घालवले. शिवसेनेच्या कोणत्या ही आमदाराला निधी मिळाला नाही, असंही किशोर पाटील म्हणाले.

तसेच सकाळी नऊ वाजता रॉकेल ची कॅन आणि माचिस ची कडी घेऊन यायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पेटवयच आणि सगळ्या मीडियानी ते विजवयच येवढाच काम संजय राऊत साहेबांचं यांचे चालू आहे. संजय राऊत साहेबांच्या इतकं नॉलेज असलेलं माणूस नाही आहे. शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत. ही वेळ भाजपाला भविष्यात आणू द्यायची नसेल तर किरीट सोमय्या सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाला समज दिली पाहिजे. आपली लेव्हल बघून आणि आपण कोणाला बोलतो हे बघून सोमय्या यांनी बोलावं, असं वक्तव्य पाटलांनी केलं आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया, असा उल्लेख केला. त्यामुळे राजकारण चांगलेच पेटले होते. यानंतर दीपक केसरकर यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले होते. केसरकर यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले. फडणवीस याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही असे केसरकरांनी स्पष्ट केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!