Share

“५ कोटी द्या; अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करणार”, धनंजय मुंडेंना महिलेची धमकी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करणार असल्याची धमकीही या महिलेने दिली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी या महिलेची मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धनजंय मुंडे यांनी तक्रारीत आपण सदरील महिलेला ओळखत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल कुरिअरच्या माध्यमातून पाठवला होता, असे  धनजंय मुंडे यांनी म्हटले आहे.  मात्र आता या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमके प्रकरण काय?

धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार या महिलेने याअगोदरही ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांचे दुकान आणि मोबाईलची मागणी केली.  मागणी पूर्ण न केल्यास बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी या महिलेची तक्रार मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!