🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs PBKS) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने पंजाबवर ९ गड्यांनी सहज धूळ चारली. दिल्ली संघात कोरोनाची प्रकरणे आढळल्यानंतर हा सामना पुण्यातून मुंबईत हलवण्यात आला. दिल्लीचा कप्तान ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि ललित यादव यांच्या फिरकीत पंजाबचा संघ अडकला आणि २० षटकात ११५ धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात डेव्हि वॉर्नरची अर्धशतकी खेळी आणि पृथ्वी शॉने दिलेली साथ या जोरावर दिल्लीने १०.३ षटकातच हा सामना संपवला. वॉर्नरने सलग तीन अर्धशतकाचे ठोकत हॅट्ट्रिक साजरी केली.
दिल्लीचा डाव
पंजाबच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करता डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी ८३ धावांची सलामी दिली. राहुल चहरने शॉला अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. शॉने २० चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावा केल्या. तर वॉर्नर ३० चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ६० धावांवर नाबाद राहिला. १०.३ षटकातच दिल्लीने लक्ष्य गाठले.
115 chased down in 10.3 overs!
As one-sided as it can get as DC annihilate PBKS#IPL #IPL2022 #DCvsPBKS
Match summary and reaction ⬇️⬇️https://t.co/Sn4DCc3RU9 pic.twitter.com/ogt8y4LGFB
— Cricbuzz (@cricbuzz) April 20, 2022
The king is back ????
David Warner in #IPL2022 so far:
4 (12) vs LSG
61 (45) vs KKR
66 (38) vs RCB
60* (30) vs PBKS – TODAY ???? pic.twitter.com/LZ6hux2m14— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 20, 2022
पंजाबचा डाव
दिल्लीचे फिरकीपटू कुलदीप यादव, ललित यादव आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीत पंजाबचा संघ अडकला. कप्तान मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांना संघाला चांगली सुरुवात करून देता आली नाही. ललितने धवनला (९) बाद करत पंजाबला दुसरा धक्का दिला. पाचव्या षटकात मुस्तफिजूरने मयंकला (२४) तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर पंजाबने जॉनी बेअरस्टो (९), लियाम लिव्हिंगस्टोन (२) यांनाही स्वस्तात गमावले. जितेश शर्माच्या ३२ धावांच्या खेळीमुळे (५ चौकार) पंजाबला शतकापार पोहोचता आले. अक्षरने त्याला पायचीत पकडले. पंजाबचा संघ २० षटकात ११५ धावांवर ऑलआऊट झाला. खलील कुलदीप, ललित आणि अक्षर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कप्तान/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
