Share

रॉकी भाईची बॉक्स ऑफिसवर दहशत, तोडले सगळे रेकॉर्ड्स…

Published On: 

 

मुंबई : रॉकी भाई सुपरस्टार यशचा चित्रपट केजीएफ चॅप्टर २ गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करत आहे. हा चित्रपट चार आठवड्यांपूर्वी रिलीज झाला आहे. मात्र अजूनही या चित्रपटाची कमाई भरभरून होत आहे. दिवसेंदिवस वाढत आहे. आता या चित्रपटाचे नवीनवीन कलेक्शनचे आकडे समोर येत आहेत.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी, या चित्रपटाच्या हिंदी नवीन कलेक्शन ची माहिती दिली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ४२० कोटी रुपयांची कमाई केली. असे त्यांनी ट्विट केले आहे.

हिंदी आवृत्ती बॉक्स ऑफिस कलेक्शन –

पहिला आठवडा: २६८.६३ कोटी
दुसरा आठवडा: ८०.१८ कोटी
तिसरा आठवडा: ४९.१४ कोटी
चौथा आठवडा: २२.७५ कोटी
एकूण – ४२०.७० कोटी

चौथ्या आठवड्यातही पैसे मिळतात. मार्व्हल युनिव्हर्स चित्रपट ‘डॉक्टर स्ट्रेंज’ रिलीज झाल्यानंतरही त्या चित्रपटाचा ‘KGF २’ च्या कलेक्शनमध्ये काहीही परिणाम झाला नाही असे, तरण आदर्श यांनी म्हंटले. तरण आदर्शच्या मते, KGF २ ने चौथ्या आठवड्याच्या शुक्रवारी ३.८५ कोटी रुपये, शनिवारी ४.२५ कोटी, रविवारी ६.२५ कोटी, सोमवारी २.३५ कोटी, मंगळवारी २ कोटी, बुधवारी १.८५ कोटी आणि गुरुवारी १.७० कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या एकूण आवृत्तीचे कलेक्शन ४२०.७० कोटी रुपये झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!