🕒 1 min read
मुंबई : कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय टीममध्ये खेळायचे असेल तर त्याला फिटनेस हा निकष असतो, पण आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मात्र आता टीममध्ये निवड होण्यासाठीचे निकष बदलले आहेत. फिटनेसबरोबरच आता खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही लक्ष दिलं जाणार आहे. राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्याआधी बोर्ड खेळाडूचा सोशल मीडियावरचा इतिहासही पाहण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य इंग्लंडचे प्रशिक्ष ग्रॅहम थोर्प यांनी केलं आहे.
कारण न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमधून पदार्पण केलेला ओली रॉबिन्सन त्याच्या जुन्या ट्वीटमुळे अडचणीत आला होता. रॉबीन्सनने वर्ष २०१२-१३ दरम्यान वर्णद्वेष आणि लैंगिकता संदर्भात अनेक वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटमध्ये रॉबीन्सनने काही शब्दाचा संदर्भ देत विशिष्ट धर्माच्या लोकांना दहशतवादी संबोधले होते. तसेच आशियाई वंशाचे लोक आणि महिला संदर्भात अपमानास्पद भाष्य केले होते. न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याचे जुने ट्विट सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
या प्रकारानंतर न्युझीलंड विरुद्ध सामन्याचा पहिला दिवस संपल्यावर रॉबिन्सनने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात त्याने,’ आजचा दिवस हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठा दिवस आहे. ८ वर्षांपूर्वी मी पोस्ट केलेल्या वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विटसची मला लाज वाटत आहे. यावेळी मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी वर्णद्वेषी किंवा लिंगवादी नाही. माझ्याकडून झालेल्या या कृत्याचा मला पश्चात्ताप आहे. माझ्या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी विना अट माफी मागतो. असं रॉबिन्सन म्हणाले. दुसरीकडे रॉबिन्सनला त्याची चूक कळाली आणि त्याने ड्रेसिंग रूममध्येही माफी मागितली, असं ग्रॅहम थोर्प बीबीसीशी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोर्चासाठी जाणाऱ्या मराठा आंदोलकांना जिल्ह्याभरात केले स्थानबद्ध
- ‘शिवराज्याभिषेक दिनी राज्यभरातील सर्व महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करणार’
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड

