Share

लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड

Published On: 

औरंगाबाद  : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी परिसर, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यान यासह शहरातील विविध भागात दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. खामनदीवर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते तर प्रियदर्शनी उद्यान येथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यानात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. खामनदी येथे दोन हजार, प्रियदर्शनी उद्यान येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक उद्यान येथे सातशे, महानगर पालिकेच्या शाळां व आरोग्य केंद्र येथे सातशे, सातारा परिसर पाचशे, बीड बायपास पाचशे व नागरिकांनी आपआपल्या परिसरात एक हजार असे एकूण दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमध्ये आंबा, सिताफळ,चिंच, जांभूळ,आवळा,नारळ,करंज, पिंपळ, लिंब, बेहडा, बांबू, ताम्हण, अर्जुन, कांचन,चाफा,मोह आदी विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, शहर अभियंता एस.डी. पानझडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, सिद्धार्थ उद्यान अधीक्षक विजय पाटील , कार्यकारी अभियंता बी.डी. फड, के. एम. फालक, माजी नगरसेवक प्रशांत देसरडा, महानगरपालिका शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक कार्य व जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार, यांत्रिकी विभागाचे पंडित,स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, इको सत्वच्या नताशा झरिन, मनपा वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान, तौकीर अहमद, प्रयास ग्रुपचे सदस्य व पर्यावरण प्रेमी तसेच नागरिक आदींनी उपस्थित राहून वृक्षरोपण केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!