Share

पुण्यात भरदिवसा महाराष्ट्र बँकवर दरोडा; तब्बल 2 कोटी 31 लाख रुपयांची चोरी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दुपारच्या सुमारास दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दुपारी 1.30 च्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळीने रिवॉल्वर लावून 2 कोटी रूपयांचे सोने आणि 31 लाख रूपये रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून येथे व्यवस्थापक मोहित चव्हाण रोखपाल सागर पानमंद व इतर दोन कर्मचारी बँकेमध्ये कामकाज करीत होते. त्यावेळी येथे दहा-बारा शेतकरी ग्राहक देखील उपस्थित होते. अचानक दीड वाजेच्या दरम्यान पांढऱ्या कलरच्या सियाज कारमधून आलेले पाच जण गाडीतुन उतरुन बॅंकेत शिरले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमधे शिरले. या नंतर दरोडेखोरांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी देत लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख रक्कम असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरांनी घेऊन कारमधून पलायन केले.

या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. पिंपरखेडपासून शिरूर पोलिस स्टेशन सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. घटना समजताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत घटनास्थळी हजर झाले. पुणे व नगर जिल्ह्यांची नाकाबंदी करण्यांची सूचना देण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र या परिसरात दिवसा प्रथमच दरोडा पडला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!