🕒 1 min read
मुंबई : चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट सिनेमाच्या माध्यमाने चर्चिला जाणारा अभिनेता अक्षय कुमार. आजवरच्या त्याच्या भूमिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. आता एका चित्रपटाच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे.
दरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातलं पहिलं गाणं शेअर केलं आहे. या गाण्याचं नाव ‘आयला रे आयला’ असं आहे. हे गाणं अक्षयच्या’खट्टा मिठ्ठा’ या चित्रपटातील आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसत आहेत. अक्षयने ‘हे गाणं शेअर करत ‘जेव्हा सिंघम, सिंबा आणि सुर्यवंशी एकत्र येतात तेव्हा उत्सव होतो’, या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CVRpubtIzMb/?utm_medium=copy_link
अलिकडेच नेटकऱ्यांनी हे गाणं पाहिलं असून आता ‘सुर्यवंशी’च्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. तर २४ ऑक्टोबरला चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे चाहत्यांना चांगलीच पर्वणी मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

