Share

औरंगाबादमध्ये येणार नदीजोड प्रकल्प; विभागीय आयुक्तांचा पुढाकार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर तसेच जिल्हा हे अनेक काळापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करत आले आहे. जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरुनही नियोजन नसल्यामुळे पाणी असुनही टंचाईचा सामना करावा लागतो. यावर मोठ्या कालावधीसाठी उपाय योजनेच्या दृष्टीकोनातुन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठाड्यात विशेष करुन औरंगाबादमध्ये नदीजोड प्रकल्प राबवावा असा प्रस्ताव समोर आणला आहे.

शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता कार्यालय हे नाशिकवरुन औरंगाबाद येथे आणावे यासाठी मागणी केली. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तुम्ही प्रस्ताव पाठवा मी बघतो असे अश्वासन दिले. या विभागासाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय, मुख्य अभियंतापदाची निर्मिती १९ सप्टेंबर २०१९ ला जीआरनुसार झाली असुन  नाशिकला ११ डिसेंबर २०२० ला कार्यालय सुरु झाले आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दमणगंगा पिंजाळ, नार-पार, गिरणा, गोदावरी, दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाद्वारे मराठवाडा व गिरणा उपखोऱ्यासाठी कोकणातील नद्यांचे १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येईल. यामुळे शेती व्यवसायासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईल व पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल असे विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितले

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!